आपण खूप खूप चुकलोय. या स्त्रियांना सतत दुयम स्थान दिलं आपण. त्यांचे हक्क, अधिकार या ना त्या कारणानं सतत हिरावून घेतलय आपण. आपल्या मुळेच तर आज हयांची ही अवस्था झालेय. दिवसेंदिवस वाढणारे बलात्कार, विनयभंग यामुळेच तर नाही का या स्त्रीयांचे प्रमाण कमी होत चाललंय. हुंडाबळीची अन गर्भपाताचे प्रमाण ही वाढत चाललंय याला जबाबदार कोण? हा नपुसकलिंगी समाज कि या पुरूषप्रधान संस्कृतीतले हुकमी एक्के हे पुरूष कि हा अन्याय गुमानपणे सहन करणारी ही स्त्री?
पण, काहीही असो, तिला मुक्त, स्वतंत्र जिवन जगण्याची संधी दयायलाच हवी. अन या गर्भपाताचा विरोध करायला हवा. अर आज ती मुलगी असली म्हणून काय झालं ती उदया कुणाची आई, बहिण, बायको, काकी, मावशी, आज्जी होईल. पण आज तिला आपण गर्भातच मारल तर उदया आपणास आई, ताई, आज्जी मावशी कुठून मिळणार. म्हणून सांगतोय या लेकरांना एक चान्स दया. मग बघा . हे सारं जग ओरडून, ओरडून सांगेल कि मूलगी हवी वंशाला म्हणून. मी जी चूक केली ती चूक तूम्ही करू नका. अन खुर्चीवरून उठण्यापूर्वी मनात ठसवा कि मुलगी हवी वंशाला म्हणून अन मिटवून टाका हा मुला-मुली मधील भेदभाव. म्हणत सावित्रीचा हात पकडून आपल्या घराकडे जावू लागतो.
Título : Mulgi Havi Vanshala
EAN : 9798227895202
Editorial : Mahadev Swami
El libro electrónico Mulgi Havi Vanshala está en formato ePub
¿Quieres leer en un eReader de otra marca? Sigue nuestra guía.
Puede que no esté disponible para la venta en tu país, sino sólo para la venta desde una cuenta en Francia.
Si la redirección no se produce automáticamente, haz clic en este enlace.
Conectarme
Mi cuenta